Home स्टोरी भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या मुलांनी घरोघरी केली अथर्वशीर्ष पठणातून सेवा…!

भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या मुलांनी घरोघरी केली अथर्वशीर्ष पठणातून सेवा…!

49

मालवण प्रतिनिधी: येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा आणि हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षांप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव काळात मालवण मधील घरोघरी जाऊन घरातील विराजमान गणपती बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण करत श्री गणेशाची सेवा केली. मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरेल स्वरात मुलांनी सादर केलेल्या अथर्वशीर्ष पठणाचे सर्वांनी कौतुक केले.

 

भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व भंडारी हायस्कुलच्या वतीने गेली काही वर्षे गणेशोत्सव काळात घरोघरी अथर्वशीर्ष पठणाच उपक्रम राबविला जात आहे. माघी गणेश जयंती उत्सवात देखील हा उपक्रम राबविला जातो. यां उपक्रमाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही

 

भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव काळात मालवण शहरातील धुरीवाडा, वायरी आदी भागात अथर्वशीर्ष पठण केले. निरंजन कांदळकर, राजू बिडये, विजय नारींग्रेकर, किशोर आंबेरकर यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा समोर मुलांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी मुलांसमवेत भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका सौ. राधा दिघे, संगीत शिक्षक विजय बोवलेकर उपस्थित होते. या मुलांना प्राथमिकच्या शिक्षिका सौ. राधा दिघे आणि हायस्कुलच्या शिक्षिका सौ. अस्मिता वाईरकर यांचे सहकार्य लाभले.