Home राजकारण राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सरकार चे मानले आभार…..

राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सरकार चे मानले आभार…..

137

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केला. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे.

राज ठाकरे यांचं ट्वीट

त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!” असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.