सावंतवाडी: राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे. या हायस्कूलच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झालेल्या विलवडे हायस्कूलच्या वर्ग खोलीच्या भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, मंत्री दीपक केसरकर यांचे पि ए रामचंद्र आंगणे, नंदू शिरोडकर, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, रमेश परब, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, वाफोली माजी उपसरपंच मंथन गवस, शिवसेना माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर, तांबोळी माजी सरपंच शिवराम सावंत, अभिलाष देसाई, असनियेचे विद्या सावंत, विनायक कोळापटे, राजन कांबळे, गुंडू जाधव, निवृत पोलीस अधिकारी अशोक देसाई, मुंबई मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दळवी, स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी विलवडे हायस्कूलच्या या इमारतीसाठी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी विनायक दळवी यांनी विलवडे परिसराचे भूषण असलेल्या राजा शिवाजी विद्यालयाची प्रशस्त व सुसज्ज इमारत बांधण्याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून या इमारतीसाठी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी हायस्कूलचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश कदम यांचा दीपक केसरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर यांनी सुत्रसंचालन सौ रुपाली बांदेकर तर आभार वनसिंग पाडवी यांनी मानले.
यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी सरपंच मोहन दळवी, प्रगतशील युवा शेतकरी प्रमोद दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, आनंद दळवी, परेश धरणे, निवृत पोलीस अधिकारी परशुराम राणे, नरेंद्र सावंत, वामन दळवी, सुभाष कानसे, गोविंद तांबे, विलास गावडे, विलास सावंत ,पोलीस पाटील पांडुरंग कांबळे, माजी मुख्याध्यापक ए के देसाई आदी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.