Home राजकारण मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है! नितेश राणे यांचं ट्विट

मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है! नितेश राणे यांचं ट्विट

81

सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दिशा सालियान केसचा संदर्भ नितेश राणे यांनी दिलाय. काय म्हणाले नितेश राणे?“जेलच्या भितीने एकनाथ शिंदेसाहेब भाजपबरोबर गेले.मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच. असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. तसेच ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.