Home स्टोरी २५ तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी?

२५ तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी?

130

२४ ऑक्टोबर वार्ता: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर २५ तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते.