Home स्टोरी २०२३ अखेरीस अणू हल्ला होईल? बाबा वंगा यांची भविष्यवाणी.

२०२३ अखेरीस अणू हल्ला होईल? बाबा वंगा यांची भविष्यवाणी.

178

७ जून वार्ता: अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचे अचूक भाकीत करणार्‍या बाबा वंगा यांच्या आणखी एक भविष्यवाणी अतिशय धक्कादायक आहे. बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये अवकाळी पाऊस, भूकंप आणि सौर वादळांबरोबरच अणु हल्ल्याचीही भविष्य वाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, २०२३ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, अशी हि भविष्यवाणी आहे. न्‍यूयॉर्क पोस्‍टने दिलेल्या वृत्तानुसार, बल्गेरियातील या दृष्टिहीन महिलेचा मृत्यू १९९६ मध्ये झाला होता. मात्र त्यांनी आतापर्यंत ज्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत त्या सर्व जवळपास खऱ्या ठरल्या आहेत. २०२३ साठीही त्यांनी अनेक भाकितं सत्य सिद्ध झाली आहेत. २०२३ मध्ये अनेक मोठ्या उलथापालथी होतील. शक्तिशाली भूकंप होतील. अवकाळी पाऊस पडेल आणि वाळवंटातही पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय वेंगा यांनी सौर वादळाचाही अंदाज वर्तवला होता.