Home स्टोरी होमगार्ड्सना सलग सहा महिने काम दिले जाईल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

होमगार्ड्सना सलग सहा महिने काम दिले जाईल! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

205

२८ जुलै वार्ता: होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिलं जाणार आहे आणि त्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे. होमगार्ड ही स्वेच्छित सेवा आहे. इतर राज्यात १८० दिवस काम दिले जाते. पण आपल्या राज्यात दिले जात नाही. माझ्या सरकारच्या काळात आपण १८० दिवस लागू केले, पण आर्थिक अडचणीमुळे हे परत थांबवले गेले. होमगार्डची खूप मदत होते, त्यामुळे आता ३५० कोटी रुपयांची तरतूद करुन होमगार्ड्सना सलग सहा महिने काम दिले जाईल. होमगार्डच्या सेवेसाठी १७५ कोटींची मर्यादा घालण्यात आली होती ती आता बंद करण्यात आली आहे. होमगार्डसाठी दर तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद करण्यात येत आहे. होमगार्डना कवायत भत्ता देखील मंजूर केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.