Home स्टोरी हुमरस गावातील अंगणवाडी इमारतीचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

हुमरस गावातील अंगणवाडी इमारतीचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

145

अंगणवाडीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल भाजप सरपंच सिताराम तेली यांनी आ. वैभव नाईक यांच्याप्रती काढले गौरवोद्गार….

 

गावाच्या विकासासाठी एकत्र आलेल्या आजी-माजी सरपंचांचे आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक.

 

 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हुमरस गावातील हेळ्याचेगाळू येथे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अंगणवाडी इमारत उभारण्यात आली आहे.त्यासाठी १२ लाख ३० हजार रु निधी मंजूर करण्यात आला होता. आज या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी भाजप पक्षाचे हुमरस गावचे सरपंच सिताराम तेली यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कामाप्रती गौरवोद्गार काढत अंगणवाडी इमारतीसाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच अंगणवाडीसाठी कंपाउंड वॉल बांधण्याची मागणी सीताराम तेली यांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे केली.

आ. वैभव नाईक यांचा सत्कार करतांना स्थानिक गावकरी

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, अंगणवाडी इमारतीसाठी माजी सरपंच अनुप नाईक यांनी पाठपुरावा केला होता.त्यानुसार त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून दिला. भविष्यात या अंगणवाडीतून अनेक विद्यार्थी घडतील. विद्यमान सरपंच सिताराम तेली हे भाजपमध्ये आणि माजी सरपंच अनुप नाईक हे शिवसेनेत असले तरी गावाच्या विकासासाठी ते दोघे एकत्र आले आहेत. गावातील लोकांनीही त्यांना साथ दिली.त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,उपतालुकाप्रमुख कृष्णा तेली, सरपंच सिताराम तेली, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख, माजी सरपंच अनुप नाईक, उपसरपंच प्रविण वारंग, श्रीपाद साधले, शाखाप्रमुख शेखर देवोलकर, उपशाखाप्रमुख संतोष परब, सिद्धेश नाईक, ज्ञानेश्वर सावंत, श्रेया मेस्त्री, अंगणवाडी सेविका अनीका सावंत, महेश वारंग, सतीश पडते, ग्रामसेवक यांसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.