Home स्टोरी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिंदूंचे...

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिंदूंचे धर्मांतर….

160

ख्रिस्ती मिशनर्‍यांमुळे हिंदूंच्या घरांत फूट.

सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील एका गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून गेल्या २ वर्षांपासून प्रार्थनेच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालू आहे. या मिशनर्‍यांकडून दाखवण्यात येणार्‍या आमिषाला बळी पडलेल्या हिंदूंमुळे हिंदूंच्याच घरांत फूट पडून वादाचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. परिणामी वाड्यांतील वातावरण कलुषित होऊ लागले आहे. यामुळे येथील संतप्त धर्माभिमानी ग्रामस्थांनी वाड्यांत आलेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांना चांगलेच खडसावले आणि गावात पुन्हा न येण्याची चेतावणी दिली.

 

१. या गावातील एका वाडीत गेल्या २ वर्षांपासून काही ख्रिस्ती मिशनरी भाड्याच्या घरात राहून प्रार्थना घेत होते. या प्रार्थनेला वाडीतील १० ते १२ जण जात होते. काही जण गावाच्या बाहेरूनही येत होते.

 

२. प्रार्थनेला जाणार्‍या काही हिंदूंनी घरातील देव काढून टाकले. यामुळे संबंधित घरांत वाद होऊन वातावरण अत्यंत कलुषित झाले. कुटुंबभावना नष्ट झाली.

३. गावातील काही धर्मप्रेमींना ही घटना कळताच त्यांनी जेथे प्रार्थनेसाठी एकत्र जमत होते, तेथे जाऊन मिशनर्‍यांना खडसावले. हिंदूंच्या वस्तीमध्ये येऊन ख्रिस्ती धर्माची प्रार्थना का करता ? तुम्ही चर्चमध्ये प्रार्थना का करत नाही ? तुमच्यामुळे वाडीतील धार्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण अत्यंत कलुषित झाले आहे.

 

४. यावर तेथे असलेल्या एका मिशनर्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे धर्माभिमानी ग्रामस्थ संतप्त झाले आणि मिशनर्‍यांना तात्काळ गाव सोडून जाण्यास सांगितले. काही ग्रामस्थांनी सांगितले की, गणपतिविषयी हे पाद्री आक्षेपार्ह विधाने करतात. हिंदु देवतांची टिंगलटवाळी करतात.

 

५. याविषयी नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले की, गावाबाहेरील व्यक्ती हिंदूचे धर्मांतर करण्यासाठी गावात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १० सप्टेंबर या दिवशी संध्याकाळी मिशनरी आणि धर्मांतरित झालेले काही हिंदू त्या वाडीत आले होते. आम्ही काही ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; परंतु वाडीतील प्रार्थनेला जाणारी एक महिला आणि तिची मुले मिशनरी अन् धर्मांतर केलेल्यांच्या बाजूने उभी राहून संपूर्ण गावाच्या विरोधात उभे ठाकले, तसेच वरील सर्व लोकांनी ऑनलाईन तक्रारही नोंद करून प्रकरण भडकावण्याचा प्रयत्न केला. याविषयी समजल्यावर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्यांनी प्रसंग योग्य पद्धतीने हाताळून दोन्ही बाजूंची समजूत काढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने (रानबांबुळीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात) बैठक घेण्यात घेतली. या बैठकीला आलेल्या पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. या बैठकीत ग्रामस्थांनी, ‘यापुढे कुणीही मिशनर्‍यांनी किंवा परजिल्ह्यातील धर्मांतर केलेल्यांनी गावात येऊन धर्माधर्मांततेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा घृणास्पद प्रकार करू नये, तसेच असे प्रकार करणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.