Home स्टोरी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट !

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट !

173

३ ऑगस्ट वार्ता: हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याची माहिती समोर आली होती. याच आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप कुरुलकर हे एटीएसच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशी दरम्यान प्रदीप कुरुलकर यांनी आपल्या मोबाइलमधील डेटा डिलीट केला होता ही माहिती तपासातून समोर आली आहे. डिलीट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसंच पाकिस्तानी तरुणी झाराशी केलेल्या चर्चांचे चॅटिंग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदीप कुरुलकरांनी आपल्या मोबाईलमध्ये असलेला डेटा डिलीट केला होता. कुरुलकर यांच्याकडे असलेला मोबाईलचा डेटा रिट्रीव्ह करण्याचे काम सुरू आहे. गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी मोबाइल पाठवण्यात आला आहे. प्रदीप कुरुलकरांनी डिलीट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसेच झाराशी केलेल्या चर्चेंचे चॅटिंग असण्याची शक्यता आहे.

प्रदीप कुरुलकर हे तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात नमूद केले आहे. दरम्यान, एटीएसने प्रदीप कुरुलकरांची व्हाईस लेअर टेस्ट करण्याची परवानगी मागितली होती. प्रदीप कुरुलकर यांच्या आवाजाच्या चाचणीवर म्हणजेच व्हॉईस लेअर सायकॉलाॉजिकल ॲनलिसिसवर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने एटीएसला कुरुलकरांची व्हाईस लेअर टेस्ट करण्यास परवानगी दिली तर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या टेस्टदरम्यान त्यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती कोणाला सांगितली आहे की नाही? तसेच सांगितली आहे तर किती माहिती दिली आहे, अशा काही गोष्टी समोर येऊ शकतात.