सिंधुदुर्ग: विश्व हिंदू परिषद रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत रामोत्सवाचे आयोजन करते. विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडाने स्वतंत्रवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वावर सावरकर विषयाचे अभ्यासक व जहाल वक्ते सिने नाट्य अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांचे व्याख्यान देशभक्त नागरिकांचा सन्मान व आपली संस्कृती पोषक कार्यक्रमांचे आयोजन करणे हे विश्व हिंदू परिषदेचे धोरण असल्याने स्वतंत्रवीर सावरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. तरी ४ एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथील कार्यक्रम साठी देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावरकर विषय समजून घेत पुढच्या पिढीला सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास जागृत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने भाऊ सामंत व संदीप बोडवे यांनी केले आहे.