स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट केलं आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘चला अतिक अहमदला मारलं, त्याच्या भावाला मारलं, त्याच्या मुलाचाही जीव घेतला.आता त्याच्या कुटुंबीयांची न्यूज चॅनल्सवर खिल्ली का उडवली जातेय? ही चांगली गोष्ट आहे का? वाईट वेळ ही कधीही कोणावरही येऊ शकते. मात्र थोडी मर्यादा बाळगा. कोणाच्याही मृत्यूवर पैसे कमावू नका.’ अतिकच्या हत्येप्रकरणी त्याने याआधीही काही ट्विट केले आहेत.केआरकेच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘माफिया डॉन हा तुझा नातेवाईक होता का? इतकं का वाईट वाटतंय तुला’, असा सवाल एकाने केला. तर ‘अतिक अहमदने २०० हून अधिक कुटुंब उद्ध्वस्त केले होते. त्याला कसली सहानुभूती दाखवतोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.