Home स्टोरी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात...

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न.

76

सावंतवाडी प्रतिनिधी: शनिवार, दिनांक २८ जून २०२५ रोजी नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. नवनियुक्त सदस्यांचा पदग्रहण सोहळा विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व समन्वयक सौ. सुषमा पालव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘ सौ. कल्पना बोडके ‘ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ अमृता सावंत यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्याचप्रमाणे सहशिक्षिका सौ. निधी सावंत यांनी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी माननीय सौ. कल्पना बोडके मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिल्यावर शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सौ. कल्पना बोडके यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर स्वागतगीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व समन्वयक सौ. सुषमा पालव यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी, प्रमुख पाहुणे सौ. कल्पना बोडके, प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री.पुंडलिक दळवी, विद्यार्थी प्रमुख कु. तनिष्क राजेश पवार व विद्यार्थिनी प्रमुख कु. स्पृहा अमेय अरोंदेकर हे उपस्थित होते. यानंतर विद्यार्थी नवनियुक्त परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली याची पीपीटी सादर करण्यात आली. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी कु. तनिष्क राजेश पवार व प्रमुख विद्यार्थिनी कु. स्पृहा अमेय अरोंदेकर यांना पाहुण्यांच्या हस्ते सॅश, बॅनर, ध्वज व बॅज इत्यादी सन्मानचिन्हे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अग्निहाऊसचा कप्तान कु. भुवन पुंडलिक दळवी व उपकप्तान वरद संततुकाराम राणे, पृथ्वी हाऊसचा कप्तान कु. नील मयूर सावंत व उपकप्तान कु. सई सुधीर नाईक, जल हाऊसची कप्तान कु. आरोही अनिल सावंत व उपकप्तान कु. रुद्र बापू मालवणकर, वायु हाऊसचा कप्तान कु. देवांग महेश सारंग व उपकप्तान कु. वरद नितीन सावंत या सर्व नियुक्त विद्यार्थ्यांना सॅशेज, बॅनर, बॅजेस व ध्वज देऊन त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. प्रिफेक्ट विद्यार्थ्यांमध्ये कु. साईना श्रीराम अळवणी, कु. प्रत्युषा प्रसाद घोगळे, कु. भूमी प्रसाद नानोस्कर, कु. अवनी मंगेश शेर्लेकर, कु. हेरंभ श्यामसुंदर नाटेकर, कु. कॅलव्हर्ट अलेक्स फर्नांडिस यांना बॅजेस व स्कार्फ देऊन त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर संचालन व शपथविधी सोहळा पार पडला. विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रमुख यांनी नियुक्त पदाचे कर्तव्य आपल्या शब्दात मांडले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. कल्पना बोडके यांनी शाळेच्या संस्थापनाचे कौतुक केले. तसेच त्यांनी शालेय जीवनात शिस्तबद्धतेचे महत्त्व विशद करत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये याच वयात मंत्रीमंडळाची संकल्पना रुजवण्याबाबत त्यांनी संस्थेचे कौतुक केले. त्यानंतर सौ. ग्रिष्मा सावंत यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे आजचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शाळेचे संचालक श्री. रुजल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.