Home स्टोरी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांचा वाढदिवस अनेक...

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा!

275

सावंतवाडी प्रतिनिधी: सहकार समाजकारण राजकारण शिक्षण अशा विविध स्तरावर मी यशस्वीतेने काम करू शकतो. त्यामागे अनेकांचे हात आहेत. माझ्यासोबत असलेल्या सर्व माझा कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचा यशस्वीतेने कारभार सांभाळत आहे. मला राजकारणात अनेक संधी आल्या होत्या. जिल्हा परिषद, जिल्हा बँक मध्ये मी निवडणुकीला उभे राहावं यासाठी मला अनेक वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सहकारात मी लक्ष दिले. माझ्या यशात सर्वांचा वाटा आहे. असेच प्रेम कायम ठेवा. असे सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने स्पष्ट केले.

श्री राऊळ हे सहकार राजकारण अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राजकारणात सक्रियतेने उतरावे अन सावंतवाडी विधानसभा मतदार संघात कार्यरत राहावे सहकार क्षेत्रातील एक हिरा अशा शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इच्छाही व्यक्त केली. सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक नेतृत्व आहे अशा शब्दात सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर यांनी गौरव उद्गार काढले कोलगाव येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्थे च्या कार्यालयात मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांचा आज २७ जुलैला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर अनेक जणांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व सह्याद्री फाउंडेशन व मित्र मंडळ यांच्या वतीने श्री राऊळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, प्रमुख पाहुणे विनया बाड, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, इंडियन एक्स सर्विस मेन लीगचे अध्यक्ष शशिकांत गावडे, आंबोली सैनिक स्कूलचे संचालक जॉय डान्टस, आंबोली सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे, माजी सभापती प्रमोद सावंत, विभावरी सुकी, संदीप सुकी राजू तावडे, आंबोली सैनिक स्कूलचे दीपक राऊळ, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सह्याद्री फाउंडेशनचे विजय चव्हाण, गजानन बांदेकर, अमोल वारंग, कोळगाव शाखेच्या शाखाधिकारी सौ ज्योती सावंत देसाई, अमोल वारंग, तारकेस सावंत, संध्या सावंत, मीना देसाई, कोलगाव माजी सरपंच श्रीमती मारिया डिसोजा, विठ्ठल बिडये, राजेश पास्ते, सुभाष देसाई, कलंबिस्त शाखाधिकारी श्री राऊळ आधी उपस्थित होते.

यावेळी श्री राऊळ पुढे म्हणाले अनेक जण मला पूर्वी मी राजकारणात असताना मी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावं अशी इच्छा होती, पण मी मज्जा काळात फारसा राजकारणात इंटरेस्ट घेतला नाही. मला त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तो जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या निवडणुकीला उभारा असे सांगितले होते. पण माझ्या मनात राजकारणात निवडणूक लढवणे हे कधीही नव्हते आणि माझी तशी इच्छाही नव्हती. मी सहकाराक्षेत्रात त बरा आहे. माझी जी जडणघडण झाली त्यामागे माझे मार्गदर्शक कर्नल सुधीर सावंत आणि सहकार क्षेत्रात मला पीएफ डान्टस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच मी सहकार क्षेत्रात यशस्वी होत आहे. माझ्या या यशामागे माझा मित्र मंडळ परिवार आणि माझा स्टाफ यांचे सहकार्य मला कायम मिळाले आहे. त्यामुळेच मी इथपर्यंत यशस्वी त्याने पोहोचू शकलो. असे ते म्हणाले.

यावेळी श्री कविटकर यांनी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे सुनील राऊळ हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ते या पतसंस्थेत पाचशे कोटी पर्यंत ठेवी नेण्यासाठी त्यांचा संकल्प आहे आणि ते निश्चित हा संकल्प पुरा करतील त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायमचे मिळणार आहे. आम्ही त्यांना या पतसंस्थेत एक आदर्श मार्गदर्शक म्हणून दर्जा कायम ठेवणार आहोत.

यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रमोद सावंत, जॉय डान्टस, विभावरी सुकी, राजू तावडे, आदींनी सुनील राऊळ हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार व राजकारणातील एक आयडॉल हिरा आहेत. त्यांनी पुढील काळात राजकारणाच्या माध्यमातून विधान परिषदेचे दरवाजे उघडावेत जेणेकरून ग्रामीण भागातील नेतृत्वाला वाव मिळेल. अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी राजकारण समाजकारण संस्था आधी विविध स्तरातील मान्यवरांनी मित्र मंडळ आदींनी शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, प्रताप परब, श्री नार्वेकर, बंटी पुरोहित, हर्षवर्धन धारणकर, सत्यजित देशमुख, मोहिनी मडगावकर, तसेच सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक आदिने शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सह्याद्री फाउंडेशनचे कार्यवाहकॲड संतोष सावंत यांनी मानले

फोटो: सावंतवाडी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ आपल्या वाढदिवसानिमित्त बोलताना, बाजूला जिल्हा बँकेचे संचालक तथा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, जॉय डान्टस, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष श्रीमती विनया बाड, उपाध्यक्ष विभावरी सुकी, राजू तावडे, प्रल्हाद तावडे आदी.

छाया: दीपक राऊळ