Home स्टोरी सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन…!

सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन…!

270

मसुरे प्रतिनिधी: आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत मालवण तालुक्यातील वायंगवडे गावचे मूल्यमापन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतेच केले.

आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवीलेला होता. समिती सदस्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाची तपासणी केली व समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.

समिती सदस्य म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी गजानन धरणे उपस्थित होते. यावेळी मालवण पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, ग्रामपंचायत सदस्य आनंद सावंत, विष्णू मेस्त्री, सुषमा परब, सानिका सकपाळ, सानिका राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जयवंत परब, ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष सीता मेस्त्री, सीआर पी रुची गावडे, बचत गट प्रतिनिधी व इतर ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांनी मानले.