Home स्टोरी सिंधू रनरनी गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन…!

सिंधू रनरनी गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन…!

139

सावंतवाडी प्रतिनिधी: जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना आणि जगाला सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील धावपटू यात सहभागी झाले होते. या धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणीही वाजविण्यात आली, तसेच मुंबई पोलीस बॅण्डनेही सादरीकरण केले. जगभरात पाच महत्वाच्या मॅरेथॉन आयोजन करणाऱ्या टाटा ग्रुप ची मुंबई मॅरेथॉन म्हणजे रनर चा कुंभ मेळा मनाला जातो. त्याचा प्रत्यय म्हणजे या वर्षी ५९००० रनर टाटा मॅरेथॉन धावले. त्यांना सहायक म्हणून जवळपास ३००० पोलीस, ४५० वैद्यकीय टीम असा फोज फाटा तैनात होता.

मुंबई मॅरेथॉनचे यंदा १९वे वर्ष होते, पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून यंदाच्या मॅरेथॉनला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी राजकीय मंडळीनी हिरवा झेंडा दाखवला. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सिंधू रनर टीम कडून १२ धावक ४२.२ किलोमीटर आणि २ धावक २१.१ किलोमीटर अंतर धावण्यासाठी सामील झाले होते. जागतिक दर्जाच्या या मॅरेथॉन मध्ये प्रत्येकाच कल हा आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा असतॊ. याचे कारण म्हणजे मुबई मॅरेथॉन चा मार्ग हा आझाद मैदान, छत्रपती शिवाजी टर्मिनल कडून सुरु होऊन वरळी सी फेस, वांद्रे वरळी सी लिंक, माहीम, परत वांद्रे, प्रभादेवी, दादर कडून वानखेडे स्टेडियम कडून छत्रपती शिवाजी टर्मिनल असा आहे. म्हणूनच प्रत्येक रनर आपला उत्कृष्ट्र वेळ नोंदवण्याचा प्रयत्न करतो.

या मॅरेथॉन मध्ये पण सिंघू रनर टीमची कामगिरी वखडण्याजोगी राहिली. तब्बल ७ धावकांनी ४ तासाच्या आतली वेळ नोंदवली. प्रत्येक धवकाची वेळ खालील प्रमाणे:

१. प्रसाद कोरगावकर ४२.१९५ किलोमीटर : ३ तास १६ मिनिट

२. पांडुरंग कदम ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ३२ मिनिट

३. नरेश मांडावकर ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ३६ मिनिट

४. तानाजी पाटील ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ४३ मिनिट

५. डॉ सुभाष पाटील ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ४८ मिनिट

६. ओंकार पराडकर ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ५६ मिनिट

७. भूषण बान्देलकर ४२.१९५ किलोमीटर : ३ तास ५९ मिनिट

८. निलेश राहणे ४२.१९५ किलोमीटर : ५ तास ३ मिनिट

९. हेमंत जाधव ४२.१९५ किलोमीटर : ५ तास ७ मिनिट

१०. संतोष पेडणेकर ४२.१९५ किलोमीटर : ५ तास ४४ मिनिट

११. निलेश मळीक ४२.१९५ किलोमीटर : ६ तास ४७ मिनिट

१२. नितीन मळीक ४२.१९५ किलोमीटर : ६ तास ४७ मिनिट

१३. भूषण साळगावकर २१.१ किलोमीटर : २ तास

१४. प्रकाश चव्हाण २१.१ किलोमीटर : २ तास ४३ मिनिट

वरील कामगिरीबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ शंतनू तेंडुलकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉ स्नेहल गोवेकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, संतोष नाईक (हुमान राईट्स अससोसिएशन अध्यक्ष सिंधुदुर्ग), देवयानी वरस्कर (दैनिक कोकण साद), सर्व पत्रकार बंधू, डॉ वि. सी. काठाने, डॉ बाबासाहेब पाटील, प्रसिद्ध कब्बडी प्रशिक्षक जावेद शेख, पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. अथक र्प्रयत्न करून सिंधू रनर टीमला नामवंत इंटरनॅशनल धावकांच्या यादीत आपले नाव करता आले याचा सिंधू रानर्स टीमला अभिमान आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्याने हे यश संपादन केले. या पुढे त्याला योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रैनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल या साठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील राहील.

सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.