Home स्टोरी सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार…! राज्य समन्वयकांच्या सूचना

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार…! राज्य समन्वयकांच्या सूचना

118

सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती.

सावंतवाडी:  मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सकल मराठा समाज मध्ये पदावर घेण्यात आले नव्हते तोच अजेंडा कायम ठेवण्यासाठी राजकीय मराठा समाज बांधवांना सल्लागार म्हणून घेण्यात आले, म्हणून राज्य स्तरीय सकल मराठा समाजाचे समन्वयक रघुनाथ पाटील, तुषार काकडे व सिंधुदुर्गातील राजकीय सल्लागार नेते मंडळी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी सकल मराठा समाज म्हणून आमचे सुरु असलेले कार्य या पूढेही अविरतपणे सुरू ठेवणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष म्हणून सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक,सचिव आकाश मिसाळ व त्यांची कार्यकारणीने यापूढेही आपले काम सूरु ठेवावे अशा सूचना सकल मराठा समाजाच्या राज्य समन्वयकांनी दिल्या आहेत, याबाबत जिल्ह्यातील मराठा राजकीय नेते मंडळींनी राज्य समन्वयकांशी बोलने करून दिल्यावर सकल मराठा समाजाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.

सकल मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली,अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला संघटनेच्या पदावर स्थान देत नाही तर त्यांना सल्लागार म्हणून घेतले जाते, राज्यात मराठा समाजाच्या सुमारे दीडशे संघटना आहेत मात्र सर्व संघटनांचा उद्देश मराठा आरक्षण हाच आहे.

सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन लवकरच याबाबत विस्तृत माहिती देण्यात येणार आहे. मराठा समाज बांधवांमध्ये कोणताही स़भ्रम निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सूचनेसार सदरचा खुलासा मी करीत आहे,असे सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.