Home स्टोरी सिंधुदुर्ग बँकेतून मंगेश मस्के ३६ वर्षाच्या प्रदीर्घ जिल्हा बँकेच्या सेवेतून मुक्त.

सिंधुदुर्ग बँकेतून मंगेश मस्के ३६ वर्षाच्या प्रदीर्घ जिल्हा बँकेच्या सेवेतून मुक्त.

187

सावंतवाडी प्रतिनिधी: आयुष्याशी अजूनही माझा करार बाकी आहे…! स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही..! हाकत आलो भरजरी, किनार बाकी आहे…! सर्व स्तरावर जगुनी माझे झाले..! माणुसकीने जगावयाचा विचार बाकी आहे…! सरणावर आता जाईन आनंदाने पण मृत्यूचा अजू.नही थोडा नाकार बाकी आहे..!

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ३६ वर्ष सेवा केल्यानंतर जिल्हा बँकेत माणगाव शाखाधिकारी असलेले आणि साहित्य क्षेत्रातील कवी नाटककार कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी ३६ वर्षाच्या प्रदीर्घ जिल्हा बँकेच्या सेवेतून मुक्त होताना कवी मन उघड केले. अन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कालच ३१ जानेवारीला कर्मचाऱ्यांसाठी वेतन वाढीचा करार केला. अन हाच धागा पकडून माणगाव शाखेत श्री म्हस्के यांनी आपल्या निरोप समारंभाला कवितेतून त्यांनी आता आयुष्याशी अजूनही माझा करार बाकी आहे. आता माझं पुढील आयुष्य हे मी साहित्य व ग्रंथालय चळवळीसाठी राखून ठेवला आहे. असं स्पष्ट केलं. माणगाव शाखेतून शाखाधिकारी म्हणून गेली सव्वा दोन वर्ष त्यांनी येथे काम केले त्यानंतर आज ते 36 वर्षाच्या सेवेनंतर ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा निरोप सत्कारसमारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोरय, आत्माराम ओटवणकर, श्री बांदेकर, शाखाधिकारी संतोष कोंडस्कर, श्री जाधव, श्री कोयंडेकर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, ग्रंथालयाच्या चेअरमन स्नेहा फणसळकर, सचिव एकनाथ केसरकर, सतीश गावडे, मेधा फणसळकर, सौ सावंत, पत्नी सौ. मस्के, मंदार म्हस्के, सून सौ मस्के, मुलगी कुमारी म्हस्के, श्री भरतू, श्री परब, श्री जाधव आधी कर्मचारी, शाखाधिकारी, तसेच महिला बचत गट च्या महिला, साहित्यिक, ठेवीदार उपस्थित होते.

यावेळी श्री मस्के यांचा जिल्हा बँकेच्या वतीने श्री मोरया यांच्या हस्ते भेटवस्तु शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक अनेक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री म्हस्के यांनी ते साहित्यिक असल्याने त्यांनी कवितेतून आपण आता पुढे काय करणार याचा उलघडा केला. मी जो इथपर्यंत पोहोचलो त्यामागे माझी आई आणि पत्नी यांचा मोठा वाटा आहे. माझी आई हिने मला प्रोत्साहन दिले. मी जोपर्यंत घरी जात नव्हतो तोपर्यंत ती माझी वाट पाहत होती. मी गेल्यावरच ती जेवायची एवढं प्रेम तिने मला दिलं. मला साहित्य जिल्हा बँक तसेच ग्रंथालय चळवळीत योगदान देण्याच्या दृष्टीने जिल्हा बँकेच्या सर्व टीमने मला सहकार्य केलं. त्यामुळे मी परदेश आणि अनेक राज्यात मोकळेपणाने फिरू शकलो. मला जिल्हा बँकेचे संचालक आर. टी. मर्गज यांनी मला येथे नोकरी दिली त्यांचे रोड मी कधी विसरणार नाही. माझ्या पत्नी व दोन मुलाने मला सहकार्य केल्यामुळेच मी चांगलं काम करू शकलो. मी ज्या ज्या शाखेत आतापर्यंत गेलो. तेथे नेहमी हित पाहिले आणि नेहमी कर्जावर ठेवी वाढवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहिलेत. मी जिल्हा बँकेचा कायमचा ऋणी राहीन. माझा मी पुढील आयुष्य साहित्य व ग्रंथालय चळवळीसाठी आणि समाजकार्यासाठी व्यतीत करणार आहे. जिल्हा बँकेची भरभराट होण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. माझ्या प्रेमा खतर कर्मचारी अधिकारी आणि संचालक मंडळ आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाला आली त्याबद्दल मी नेहमी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणाले.

यावेळी संचालक प्रकाश मोरय यांनी श्री मस्के यांचे साहित्य व ग्रंथालय चळवळीत फार मोठे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा बँकेच्या उन्नतीसाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या या चांगल्या कामाची दखल निश्चितपणे जिल्हा बँकेने घेतली आहे. यावेळी श्री बांदेकर श्री ओटवणेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.

कोकण मराठी साहित्य परिषद चे सावंतवाडी अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग मध्ये सहकार रुजवण्याच्या दृष्टीने कोकण सहकार रत्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ओळख आहे. ते सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या सहकार कर्मभूमीत साहित्य ग्रंथालय चळवळीतील मंगेश मस्के यांचा आज सत्कार होत आहे. श्री म्हस्के यांचे जिल्हा बँकेतील योगदान फार मोठे आहे. त्यांनी यापुढे साहित्य व ग्रंथालय चळवळीसाठी काम करावे त्यांच्या कामाचा अनुभव पाहता जिल्हा बँकेने त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी द्यावी. असे स्पष्ट केले.

यावेळी माणगाव वाचनालयाच्या अध्यक्ष स्नेहा फणसळकर, मेधा फडसळकर, श्री परब, श्री जाधव, श्री बांदेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मस्के यांच्या सौभाग्यवती, सौ म्हस्के यांनी कविताही सादर केली. त्या म्हणाल्या एका यशस्वी पुरुषाच्या मागे जेव्हा महिला घरी कुटुंब सांभाळते तेव्हा निश्चितपणे त्या पुरुषाचा यशस्वी कडे वाटचाल असते मस्के यांच्या कार्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिली. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण आम्ही खचून गेलो नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी सूत्रसंचालन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री लिंगायत यांनी केले व श्री मस्के यांचा एकंदरीत सर्व क्षेत्रातील कार्य अहवाल चे वाचन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.