Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ मार्फत उद्या विद्यार्थी गुणगौरव..!

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ मार्फत उद्या विद्यार्थी गुणगौरव..!

111

 

प्रा. राजाराम, प्रा. रुपेश पाटील प्रमुख वक्ते! 

 

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे.

यावेळी कुडाळ तालुक्यातील चर्मकार समाजातील सन 2022  – 23 या शैक्षणिक वर्षात स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा विशेष उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा यथोचित  सन्मान करण्यात येणार आहे.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष मनोहर सरमाळकर असून प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संचालक आत्माराम ओटवणेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, ॲड. अनिल निरवडेकर, नायब तहसीलदार श्री. प्रदीप पवार असणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन प्रा. राजाराम परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रुपेश पाटील हे विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर आंबेकर, जिल्हा सहसचिव सुभाष बांबुळकर, भवन समिती सहप्रमुख के. टी. चव्हाण, उदय शिरोडकर, भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, कुडाळ तालुका मार्गदर्शक राजन वालावलकर, जिल्हा सदस्य प्रिया आजगावकर, जिल्हा सदस्य ॲड. राजीव कुडाळकर, कुडाळ तालुका सल्लागार रामदास चव्हाण असणार आहेत.

तरी कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन कुडाळ तालुका कार्यकारिणीचे सचिव रत्नदीप जाधव, कोषाध्यक्ष मधुकर चव्हाण,  उपाध्यक्ष साधना चव्हाण, राजन चव्हाण, संतोष चव्हाण, प्रमोद आजगावकर, सहसचिव रश्मी वालावलकर, केतन शिरोडकर, प्रकाश तेंडोलकर, राजेश चव्हाण, तसेच सदस्य प्राध्यापक सुभाष बांबुळकर, देविदास चव्हाण, सुरेश पिंगुळकर, लक्ष्मण पावसकर, नरेंद्र चव्हाण, प्रिया आजगावकर, सुजाता जाधव, गजानन बांबुळकर, नितीन बांबर्डेकर,  दत्ताराम कसालकर, अविनाश अणावकर, गणपत चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, मधुकर जाधव, संतोष चव्हाण , बापू हुमरमळेकर, दीपक चव्हाण, सुप्रिया कसलकर व कायदेशीर सल्लागार ॲड. राजीव कुडाळकर यांनी केले आहे.