१४ जून वार्ता: शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ दि. १५ जून २०२३ पासून सुरु होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व शाळा दि. १५ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व पूर्व तयारी करण्यात आलेली आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्र शिक्षाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दि. १३ जून रोजी आढावा सभा घेवून शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निकषानुसार पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एकुण ५७४६८ पाठयपुस्तके प्राप्त झाली असून ती शाळास्तरापर्यंत पोहोच करण्यात आलेली आहेत.
तालुकानिहाय पाठयपुस्तके खालीलप्रमाणे-
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत् पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव शाळा शाळांमध्ये मोठया उत्साहाने साजरा होणार आहे. दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत उत्साहपुर्व व आनंददायी वातावरणात होणार आहे.शाळा प्रवेशोत्सवाबरोबरच शाळापूर्व तयारी पहिले पाऊल मेळावा क्र. २ चे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. तसेच शाळांशाळांमध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरणासाठी तालुकानिहाय खालीलप्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना एक गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
पुणे येथे होणाऱ्या G20Summit च्या पार्श्वभूमीवर लोकसहभाग मिळावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याअंतर्गत आज दि. १४ जून रोजी ओरोस येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये डायट, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.निपुण भारत कार्यक्रमाची नियोजनपुर्वक अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निपुण भारत अंतर्गत पायाभूत संख्याज्ञान व साक्षरतेसाठी आवश्यकते मार्गदर्शन करण्यात आलेले असून प्रत्येक विद्यार्थी निपुण करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी शाळा सज्ज आहेत.
यावर्षीसुध्दा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुलकलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा, बाल कला क्रीडा महोत्सव, इसरो शैक्षणिक सहल इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हयामध्ये १२८ शाळा शून्य शिक्षकी झाल्या असल्यातरी उपलब्ध शिक्षकांमधून या सर्व शाळांवर शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षकाविना कोणतीही शाळा बंद राहणार नाही याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशीत करावे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे.