Home स्टोरी साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीतर्फे सावंतवाडी तालुका मर्यादित...

साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीतर्फे सावंतवाडी तालुका मर्यादित खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे आयोजन….!

218

सिंधुदुर्ग: साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, संचलित, दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी.यांच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये होणार आहेत. पाचवी ते सातवी गटासाठी “माझा दिव्यांग मित्र व मी” हा विषय आहे. तर आठवी ते दहावी गटासाठी दिव्यांगत्व सहानुभूती नको साथ हवी. हा विषय आहे.

 

सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक शाळेमधील वरील प्रमाणे वर्गातील सर्व मुलांना विषय देऊन त्यांनी त्या विषयावर स्व हस्ताक्षरात निबंध लिहून दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर निबंधाचे pdf किंवा फोटो १ डिसेंबर २०२३  रोजी रात्री ८ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

पहिल्या गटातील ३ मुलांना प्रथम द्वितीय व तृतीय तसेच दुसऱ्या गटातील तीन मुलांना प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक दिलं जाईल.

पहिल्या गटातील मुलांनी सौ.सुनेत्रा खानोलकर, व्हाट्सअप नं् (8007449796) तर दुसऱ्या गटातील मुलांनी सखाराम नाईक, व्हाट्सअप नं.  (9423318846) या क्रमांकावर निबंध पाठवावेत.

सूचना:-

१)   स्पर्धेत निबंध सादर करण्यापूर्वी कृपया दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर आपल्या व्हाट्सअप नंबर ने संपर्क करावा .

२) निबंध स्व हस्ताक्षरातच मराठीत लिहिलेला असावा.

३) निबंध जास्तीत जास्त मागेपुढे दोन पानावरच असावा.

४) निबंधावर कुठल्याही पेजवर स्वतःचं नाव, पत्ता, शाळेचे नाव किंवा मोबाईल नंबर लिहू नये.

४) निबंध  व्हाट्सअप नंबर वरून निबंधाचे pdf किंवा फोटो पाठवावा.

५)1 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8 नंतर आलेल्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.

पहिल्या गटातील ३ मुलांना व दुसऱ्या गटातील ३ मुलांना रविवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी रात्री आठ वाजता व्हाट्सअप द्वारे आपल्याला पालकांसोबत आमंत्रित केल जाईल. कृपया  जास्तीत जास्त दिव्यांग ,शिक्षक,पालक व मुलांनी या कार्यक्रमात सहभागि व्हावे असे आवाहन सचिव श्री.एनजी देसाई यांनी केलेे आहे. तरी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग व्हावे ही विनंती.

 

 

 सचिव – स्वाक्षरीत.

साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी