Home राजकारण सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही! शरद पवार

सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही! शरद पवार

57

आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सावरकर आणि हिंदुत्वाबद्दल भूमिका स्पष्ट केली. सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती आम्हांला मान्य नसल्याचं शरद पवारांनी आज स्पष्ट केलं आहे. पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, सावरकरांनी काही पुरोगामी विचार मांडले. जसे त्यांनी घरासमोर मंदिर बांधले आणि दलित पुजारी नेमला. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. सध्या महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. तरीदेखील धर्म आणि जातीवरुन वाद सुरु आहे. याशिवाय काल अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवलं पाहिजे असा सल्ला पवारांनी यावेळी दिला.