Home स्टोरी सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रांत विकास सावंत.

सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रांत विकास सावंत.

229

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी विक्रांत विकास सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राणी पार्वती देवी हायस्कूल च्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची कार्यकारणी बैठक आज संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र असलेले विक्रांत सावंत यांचे अध्यक्षपदी निवड आज कार्यकारिणीने जाहीर केली.

यावेळी उपाध्यक्ष दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक. खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, संदीप राणे, सतीश बागवे, वसुधा मुळीक. छाया सावंत, स्नेहा परब आदी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. त्यांची निवड जाहीर होताच संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक आदी सदस्यांनी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आपण सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे श्री सावंत यांनी स्पष्ट केले. त्यांची निवड जाहीर होतात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे