Home स्टोरी सावंतवाडी शहरातील हिंदुहृदय सम्राट (आपला दवाखाना) क्लिनिकचे छप्पर पडले…!

सावंतवाडी शहरातील हिंदुहृदय सम्राट (आपला दवाखाना) क्लिनिकचे छप्पर पडले…!

119

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात मिलागरी हायस्कूल जवळ हिंदूहृदय सम्राट (आपला दवाखाना)  क्लिनिक चे छप्पर काल मंगळवारी कोसळले. सुदैवाने ज्यावेळी छप्पर कोसळले त्यावेळी क्लिनिकमध्ये कोणी रुग्ण उपस्थित नव्हते. तसेच कर्मचारी उपस्थित नव्हते. या क्लिनिकचे डॉक्टर ज्या ठिकाणी रुग्णांना तपासतात त्याच ठिकाणचे छप्पर कोसळले आहे. संध्याकाळी सुमारे ५  वाजता हे क्लिनिक सुरू होते. संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे क्लिनिक रुग्णांसाठी खुलं असतं. या दरम्यान जवळपास ५० ते ६० पेक्षा जास्त रुग्ण या दवाखान्यात उपचार घेतात. मात्र असं असताना सावंतवाडी नगरपालिकेने कधी ह्या इमारतीची योग्य ती तपासणी केली नाही. ही इमारत फार जुनी आहे. हे नगरपालिका अधिकाऱ्यांना माहित आहेच. तसेच ही इमारत धोकादायक झाली आहे. याची जाणीव नगरपालिका अधिकाऱ्यांना आहे. असं असतानाही नगरपालिका अधिकाऱ्यांनी या इमारतीकडे दुर्लक्ष केलं हे नाकारता येणार नाही. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे काल मोठी जीवित हानी होण्याची शक्यता होती.  परंतु सुदैवाने त्यावेळी रुग्ण आता तसेच क्लिनिक चेक कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसताना छप्पर पडल्याने जीवित हानी टळली.

एकंदरीत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ बऱ्याच सरकारी रुग्णालयांची दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनताच या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असतात. कोणीही श्रीमंत व्यक्ती या रुग्णालयांमध्ये येत नसतात. किंवा कोणीही राजकीय नेते राजकीय पुढारी अशा रुग्णालयांमध्ये उपचार घेत नसतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांकडे राजकीय नेत्यांचे लक्ष आहे की नाही? सर्वसामान्य माणूस मतदान करण्यापुरताच गरजेचा आहे काय? इलेक्शनच्या काळात ज्या मतदारांच्या मागेपुढे हे राजकीय नेते फिरत असतात त्या नेत्यांनी इलेक्शन काळ संपल्यानंतर मतदारांची सर्वसामान्य लोकांची गरजच नाही काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सर्वसामान्य जनता सर्वसामान्य जनतेचा वापर हा फक्त आणि फक्त मतदानासाठीच होत आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आला तर वावगं ठरणार नाही. आज खरंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधा कोलमडलेल्या आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा बांबुळी येथील हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. हे आता सिद्ध झालेच आहे. परंतु काल घडलेली हिंदूहृदय सम्राट क्लिनिक मधील घटना हि आपल्या प्रशासनाला आणि सरकारला लाजिरवाणी ठरवणारी आहे. हे नाकारता येणार नाही. काल जर  हिंदुरुदय सम्राट दवाखान्यात रुग्ण उपस्थित असते, तसेच सर्व रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित असते आणि त्यावेळी हे छप्पर पडून जीवित हानी झाली असती, तर ह्याला जबाबदार कोणअसता? असाही प्रश्न उपस्थित होतो. छप्पर पडल्याची घटना समजल्यानंतर उशिरा माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर यांनी रात्री रुग्णालयाची पाहणी केली.