Home स्टोरी सावंतवाडी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ऊबाठा सेनेचे आशिष सुभेदार आक्रमक…! प्रशासनाला दिला आंदोलनाचा...

सावंतवाडी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ऊबाठा सेनेचे आशिष सुभेदार आक्रमक…! प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा.

51

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात आणि उपरलकर स्मशानभूमी ते बसस्थानक गरड येथून बांदयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. गाड्यांचे नुकसान होतात. नागरिकांची मागणी लक्षात घेता हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत.

शहरातील बाजारपेठेत खड्ड्यांचे प्रमाण मोठे आहे. काही ठिकाणी सिमेंट घालून हे खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले आहे. तर अनेक खड्डे तसेच आहेत वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरण वाहून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराचे पालिका प्रशासनाकडून लाड सुरू असल्याचे दिसत आहेत.

तर उपरलकर देवस्थान येथून गरड परिसरात जाणारा जुना महामार्ग खड्डेमय झाला आहे याबाबत वारंवार लक्ष वेधून सुद्धा बांधकाम विभागाची यंत्रणा लक्ष द्यायला तयार नाही. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात हे रस्ते न बुजवल्यास आम्ही उध्दव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून माती घालून बूजवु. तसेच वेळ आला तर आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला ऊबाठा सेनेचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.