Home स्टोरी सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

138

सावंतवाडी प्रतिनिधी:

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने सोमवारी १६ व १७ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सोमवारी १६ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने…. 

सायंकाळी ४:३० वाजता सतपुरुष प्रासादीक भजन मंडळ निरवडे ( बुवा गौरी पारकर ), सायंकाळी ५:३० वाजता गोठण प्रासादीक भजन मंडळ वजराठ ( बुवा सोमेश वेंगुर्लेकर ), सायंकाळी ६:३० वाजता श्री देव सावंत वस प्रासादीक भजन मंडळ इन्सुली ( बुवा वैभव राणे ), सायंकाळी ७:३० वाजता प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादीक भजन मंडळ कुडाळ ( बुवा राजेश गुरव ), रात्री ८:३० वाजता श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा रूपेश यमकर )

मंगळवारी १७ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने….

सायंकाळी ४:३० वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले ( बुवा अथर्व होडावडेकर ), सायंकाळी ५:३० वाजता स्वरधारा प्रासादीक भजन मंडळ तांबुळी ( बुवा अमित तांबुळकर ), सायंकाळी ६:३० वाजता श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ मातोंड ( बुवा विशाल घोगळे ), सायंकाळी ७:३० वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कलंबिस्त ( बुवा संतोष धर्णे ), रात्री ८:३० वाजता सनामदेव प्रासादीक भजन मंडळ सांगेली ( बुवा खेमराज सनाम ),

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७७७७ रुपये, द्वितीय ५५५५ रूपये, तृतीय ३३३३ रूपये, उत्तेजनार्थ २००० रूपये, स्पर्धेतील उकृष्ट गायक २००० रूपये, तर पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादक यांच्यासाठी प्रत्येकी १००० रुपयाचे पारीतोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बाबु इन्सुलकर मेस्त्री ९८२३२२०८६८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.