Home स्टोरी सावंतवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर...

सावंतवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवारी सेवानिवृत्त.

85

सावंतवाडी प्रतिनिधी: कनिष्ठ अभियंता विजय जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्परता अधिकाऱ्यांमुळे पाटबंधारे खात्याची जनतेमधील प्रतिमा सुधारते. आपल्या सेवेतील शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा सार्थकी लावून अधिकाऱ्यांसह सर्वांचेच प्रेम मिळवले हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे श्री जोशी यांचे जिल्ह्याच्या पाटबंधारे खात्यात उल्लेखनीय योगदान आहे. असे गौरवोद्गार तिलारी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी काढले.

सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्पाच्या कणकवली व सावंतवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश जोशी हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पाटबंधारे विभागाच्या सावंतवाडीत उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात विनायक जाधव बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपकार्यकारी अभियंता आर के तुपे, तिलारी पाटबंधारे खात्याचे उप कार्यकारी अभियंता संतोष कविटकर, सौ मीनल जोशी, सौ जाधव, उप विभागीय अभियंता उपअभियंता महेंद्र डामरेकर, श्री दळवी, चंद्रकांत सडेकर, धामापूर पाणी संस्थेचे राजेंद्र परब, मंथन गवस, श्री सुतार, रामचंद्र राऊळ, कनिष्ठ शैलेश परब, लिंग्रज, निवृत्त गटविकास अधिकारी श्री सुतार श्री दळवी, श्री तुरंबेकर, मी धारवडकर, सर्व कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सर्व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, चौकीदार आदी उपस्थित होते.

यावेळी आर. के. सुपे यांनी जिल्हातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पाची सर्व कामे प्रामाणिक जलद गतीने व चोखपणे करण्यात रमेश जोशी यांनी नेहमीच प्राधान्य दिले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासह त्यांना न्याय देताना कामाच्या उत्कृष्ट दर्जाबाबत त्यांनी ठेकेदारांना कधीही पाठीशी घातले नसल्याचे सांगून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी संतोष कविटकर यांनी रमेश जोशी यांनी जिल्ह्यातील अनेक तलावांच्या बांधकामापासून कालवे, सिंचन व्यवस्थापन ते पाणी पट्टी वसुलीत केलेले काम सर्व अधिकारी वर्गांसाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी महेंद्र डामरेकर यांनी रमेश जोशी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा पाटबंधारे खात्यातील अधिकारी वर्गाना होणार असल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र परब यांनी श्री जोशी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन अडलेले काम पूर्ण करून अशक्य ते शक्य केल्याचे सांगितले.

यावेळी सौ जाधव यांनी रमेश जोशी यांच्या कार्यकाळातील सर्वोत्कृष्ट कामाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी श्री शेणई, चंद्रकांत बिले, नाटलेकर शैलेंद्र परब श्री सुतार, राजू तावडे, मंथन गवस, चंद्रकांत सडेकर, श्री भुते,आर व्हि नाईक विश्वनाथ राऊळ, सौ ओटवणेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश जोशी यांना सेवानिवृत्तीनिमित्त तिलारी व पाटबंधारे खात्याच्या आजी – माजी सर्व वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी व कर्मवीर कर्मचारी चौकीदार यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी रमेश जोशी म्हणाले, पाणी हे जीवन आहे आणि अन्नदाता शेतकऱ्यांच्या शेती बागायतीसाठी देण्याचे महान कार्य माझ्या हातून घडल्यामुळे मी समाधानी आहे. आपल्या सेवेत पाटबंधारे खात्याचे आजपर्यंतच्या सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, ठेकेदार, पाणी वापर संस्था, शेतकऱ्यांचे सहकार्य तसेच पत्नीची समर्थ साथ लाभल्यामुळेच आपण पाटबंधारे खात्यात संस्मरणीय काम करू शकलो. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आले तरी लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून घेतल्यास सर्व प्रश्न मार्गी लागतात. यावेळी रमेश जोशी यांनी उपस्थित सर्वांना प्रबोधनात्मक ‘ तुषार्त पथिक’ हे आत्मवृत्त पुस्तक भेट म्हणून दिले.

दरम्यान सायंकाळी पाटबंधारे खात्याच्या आंबडपाल विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता गोविंदे श्रीमंगले यांच्याहस्ते रमेश जोशी आणि त्यांच्या पत्नी मिनल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोविंद श्रीमंगले यांनी कोणत्याही कामाचे चॅलेंज स्विकारून ते वेळेत पूर्णत्वास नेण्यास माहीर असलेल्या रमेश जोशी यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा या विभागातील नवीन शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना व्हावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यापुढेही सेवेत राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता आर के तुपे, सहायक अभियंता आकाश जाधव, जलसंधारण अधिकारी भूषण नार्वेकर, श्री कापडोसकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री गावडे, श्री नाटलेकर, श्री सनाम, निनाद, कु सोनाली, कु वैभवी, रवींद्र जोशी, अविनाश जोशी, सुरेश सावंत, सौ समिक्षा सावंत, पुरुषोत्तम राऊळ, एकनाथ राऊळ, योगेश बेळणेकर, महेश उर्फ बाळा रावराणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन निवृत्त अभियंता लक्ष्मीकांत डूबळे यांनी तर आभार कनिष्ठ अभियंता श्री आंदुर्लेकर यांनी मानले.