सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची भाजपची संघटन पर्व बैठक उद्या शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी, ४:३० वाजता बॅरिस्टर नाथ सभागृह येथे होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री तथा मच्छी व बंदर विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले आधी तिन्ही तालुक्यातील विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.