Home स्टोरी सावंतवाडी येथे शाळकरी मुलाने बनवलेले पेंटिंग चे प्रदर्शन!

सावंतवाडी येथे शाळकरी मुलाने बनवलेले पेंटिंग चे प्रदर्शन!

416

सावंतवाडी: सावंतवाडी येथील अस्मसा आर्ट अकादमी येथे शुक्रवार १६ ते १८ जून या कालावधीत भरवण्यात आले आहे सावंतवाडी येथील सालाई वाडा होंडा शोरूम जवळ च्या इमारतीत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार सुनील नांदोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या अकादमीमधील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही पेंटिंग दर्जेदार आहेत अशा शब्दात कौतुक केले.

यावेळी शिवसेनेच्या महिला नेत्या अनारोजिन लो बो प्रिंटर, सत्यम मल्हार, अक्षय सावंत, रमाकांत मल्हार आधी उपस्थित होते. सावंतवाडी येथे या अकादमीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग सुरू केले आहेत. या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंगचे प्रदर्शन गेले तीन दिवस भरवण्यात आले आहे. श्रीमती लोबो यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले या पेंटिंगचे प्रदर्शनाला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रविवार१८ जून पर्यंत १० ते पाच या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या पेंटिंग अशा आहेत जवळपास शेकडोहून अधिक पेंटिंग या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत विद्यार्थ्यांनी बनवलेले पेंटिंग चे प्रदर्शन असे पहिलेच भरत आहेत.