Home स्टोरी सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आठ फुटी भव्य पणती...

सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आठ फुटी भव्य पणती पेटवून श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त आनंदोत्सव साजरा…!

168

सावंतवाडी: सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आज श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सात वाजता आठ फुटी भव्य अशी पणती पेटवण्यात आली आणि एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आणि पोकळे बांधव उपस्थित होते. या काळाभैरव कुलदेवता मंदिरामध्ये एखादा उत्सव अथवा उपक्रम असला तरच पणती पेटवण्याची प्रथा आहे. आज अयोध्या येते श्री प्रभू राम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्ताने या मंदिरात आज श्री राम उत्सव साजरा करण्यात आला.