सावंतवाडी: सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पुर्वीच्या ‘सावंतवाडी संस्थानाचे’ राजधानीचे शहर होते. सावंतवाडी इथल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मोती तलावला, आत्मेश्वर तळी, नरेंद डोंगर, हनुमान मंदिर, राजवाडा, भोसले उद्यान, शिल्पग्राम अशी अनेक पर्यटन स्थळे सावंतवाडी शहरात आहेत. यामुळेच सावंतवाडी शहराला दुसरं नाव सुंदर वाडी असा आहे. मात्र सध्या अनेक कारणांमुळे या सुंदरवाडी ची दुरावस्था झाली आहे हे नाकारता येणार नाही.
सावंतवाडीत राहणाऱ्या नागरिकांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे सावंतवाडी शहरातील स्वच्छतेबाबत होय.
सावंतवाडी शहरातील समस्या पुढीप्रमाणे
१) सावंतवाडीतील गटार आणि नाल्यातून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे आणि या दुर्गंधीमुळे सावंतवाडी शहरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक आजारांना सामोरे लागू शकते. अर्थातच सावंतवाडी शहरात राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे असे दिसून येत आहे.
२) सावंतवाडी शहरांमध्ये मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांमुळेहि सावंतवाडी शहरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कित्येक नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला काही संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी आणि वरिष्ठ नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन ही सावंतवाडी प्रशासनाने याबाबतही कोणतेही योग्य नियोजन केलेले नाही.
३) सावंतवाडी शहरात मधोमध असलेला आणि साहजिकच सावंतवाडी शहराच्या सौंदर्यत भर पाडणाऱ्या दुरावस्था झाली आहे. याबाबत वेळोवेळी काही संघटनांनी, राजकीय पुढार्यांनी आणि पत्रकारांनी आवाज उठवूनही मोती तलावाच्या दुरवस्थेबाबतनगरपालिका प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. तसेच सध्या डिसेंबर महिना सुरू असून मोती तलावात खूपच पाणी कमी आहे आणि असलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरत आहे. तलावातील पाण्याची आता ही अवस्था असेल तर पुढे पाऊस येण्यासाठी अजून पाच महिने आहेत. मग पुढे मोती तलावाची अवस्था काय होईल? असा प्रश्न उपस्थित होतो. पावसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन केलं असतं तर मोती तलावात स्वच्छ पाणी असतं आणि तलावाची सुंदरता वाढली असती हे नाकारता येणार नाही.
४) सावंतवाडी शहरात राहणारे नागरिक सकाळी व्यायाम कारण्यासाठी, चालण्यासाठी शहरातील मोती तलावाच्या काठावर जातात. या ठिकाणी भरपूर मोकाट फिरणारे कुत्रे आहेत. असं असताना सावंतवाडी तळ्याच्या काठावर असलेल्या लाईट सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंधार असतांना बंद करण्यात येतात. यामुळे तळ्याच्या काठावर सकाळी व्यायाम कारण्यासाठी, चालण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही वेळ अंधारात काढावा लागतो. अशावेळी या ठिकाणी भटके कुत्रे असल्यामुळे लाईट बंद झाल्यावर भटके कुत्रे नागरिकांवर हल्ला करू शकतात हे नाकारता येणार नाही. त्यामुळे इथेही प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो.
५) सावंतवाडी शहरात सध्या गोवा बनावटीची दारू विक्री जोरदार सुरू आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सावंतवाडी शहरातील काही महत्त्वाच्या अड्ड्यावर गोवा बनावटीची दारू विकली जाते. याकडे प्रशासनाचा आणि पोलिसांचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हा दुर्लक्ष जाणून-बुजून असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच अशी माहिती मिळत आहे की, सावंतवाडी शहरातील शाळा आणि कॉलेजच्या आसपास गांजा, मावा, सिगारेट आणि तंबाखूची दुकाने असून कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी व्यसनाच्या अधीन जात आहेत. असं असेल साहजिकच पुढच्या पिढीलाही धोका निर्माण होत आहे हे नाकारता येणार नाही. तसेच शहरातील नरेंद्र डोंगरावर सध्या सर्व प्रकारच्या पार्ट्या बिनधास्त पणे केल्या जातात. आणि पार्ट्या झाल्यानंतर गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी फेकल्या जातात.
अशा अनेक समस्यांनी सध्या सावंतवाडी (सुंदरवाडी) शहर ग्रासलेले आहे आणि असं असतांना याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि विशेष करून पोलिसांचा पूर्णतः दुर्लक्ष आहे की काय? सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे काम शून्य आहे काय? असे प्रश्न उपस्थित होतात..