सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषद आज दि .३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करणार आहे. आज ११ वाजता भोंगा वाजवला जाईल तरी नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयामार्फत आज दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ठीक १०.५८ वाजता भोंगा वाजविणेत येईल यावेळी शहरातील सर्व नागरिकानी आहे त्या जागेवर उभे राहून आदरांजली वाहावी ,
सकाळी ११ वाजता दूसरा भोंगा देण्यात येईल त्या वेळी सर्वानी पूर्ववत आपले काम सुरू करावे. असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री . सागर साळुंखे यांनी केले आहे