Home स्टोरी सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची निवड…!

सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची निवड…!

110

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी पी.ए. गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे. श्री नाटेकर हे यापूर्वी या समितीच्या सदस्य पदी वीस वर्ष कार्यरत होते. त्यांच्या एकंदरीत कामकाज अनुभवावरून त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर महादेव उर्फ संजू पांगम, शिवानी दिनेश पाटकर, सौ. प्रांजल प्रशांत जाधव, श्री  शंकर संभाजी साळगावकर, श्री. विनोद सुखदेव सावंत, श्री. संजय बाबुराव देसाई, श्री. साबाजी देऊ धुरी, श्री. सत्तार महंमद पटेल व शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, सचिव तहसीलदार श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून ही समिती गठित करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारसीनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.