Home स्टोरी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ आयोजित.

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ आयोजित.

97

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील भंडारी जातीतील १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती धारक, पदवी, पदविका प्राप्त तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा क्षेत्रातील विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२:३० ते ०५:३० वाजता सावंतवाडी भंडारी मंडळ, सावंतवाडी (शाळा नंबर ४ चे मागे खासकीलवाडा) येथे मान्यवरांच्या उपांश्यतीत आयोजित करण्यात आला आहे.

 

मार्च २०२५ मध्ये झालेल्या एस.एस.सी. (१० वी) परीक्षेत ८०% किंवा अधिक व एच.एस.सी. (१२वी) परीक्षेत ७०% किंवा अधिक गुण, तसेच पदवी, पदविका, प्रथम श्रेणी प्राप्त भंडारी ज्ञातीतील वि‌द्यार्थ्यांनी आपली संपूर्ण माहिती मंडळाच्या विहित नमुन्यातील फॉर्म मध्ये भरून गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह भंडारी भवन सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २५ दीसरा करीत आहोत. जुलै २०२५ रोजी पर्यंत आणून द्यावेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तप्रसाद अरविंदेकर व सचिव श्री. दिलीप पेडणेकर यांनी केले आहे.