Home स्टोरी सायबर गुन्ह्या बाबत जागृत रहा! पो. उपनिरीक्षक सुधीर कदम

सायबर गुन्ह्या बाबत जागृत रहा! पो. उपनिरीक्षक सुधीर कदम

88

मुणगे येथे सायबर सेक्युरीटी व जनरल अवेअरनेस उपक्रम….

 

मसुरे प्रतिनिधी:

 

आज जरी तुम्ही विद्यार्थी आहात पण उद्या तुम्ही देशाचे भविष्य आहात. अनावधानाने घडलेल्या कृतीने तुम्ही एखाद्या मोठ्या घटनेचे व प्रकरणाचे आरोपी बनू शकता. फोटोंचे मॉर्फिंग, ब्लॅक मेलिंग केले जाते. सेल्फी काढताना होणारे अपघातसुद्धा वाढत आहेत. ‘इन्टंट’ पैसे व कर्ज यामधून प्रोसेसींग फी वसुल करुन फसवणूक केली जाते. त्यामुळे आपण कोणत्या लिंकवर क्लिक करतोय त्याचे भान राखणे हीच काळाची गरज आहे. असे प्रतिपादन देवगड पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम यांनी मुणगे येथे केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस ठाणे हद्दीतील श्री भगवती हायस्कुल आणि ज्यू कॉलेज मुणगे येथे सिंधुदुर्ग पोलीस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या संयुक्तपणे “सायबर सेक्युरीटी व जनरल अवेअरनेस” अंतर्गत वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने काय सुरक्षा बाळगावी ? आणि याप्रकारचे गुन्हे कसे घडतात ? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना एमकेसीएल च्या महेश चौकेकर यांनी पी पी टी प्रेझेंटेशन सादर करून सायबर गुन्ह्याबाबत माहिती दिली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यात गुन्हेगार सराईत असून नागरिकांना अनेक युक्त्या करून फसवित आहेत. याबाबत जन माणसांत जनजागृती होणे आवश्यक आहे असे पो. उपनिरीक्षक सुधीर कदम म्हणाले.

यावेळी मुख्याध्यापिका एम बी कुंज, प्रसाद बागवे,प्रणय महाजन,  गौरी तवटे, एन जी वीरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका कासले, सौ मिताली हिर्लेकर, झुंजार पेडणेकर, स्वप्नील कांदळगावकर, एन एल बागवे तसेच विध्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सौ गौरी तवटे यांनी केले.