Home स्टोरी सामाजिक बांधिलकी आयोजित सावंवाडीतील नववर्ष स्वागत कार्यक्रम बेधुंद २०२४ उत्साहात, जांभोरे दाम्पत्य...

सामाजिक बांधिलकी आयोजित सावंवाडीतील नववर्ष स्वागत कार्यक्रम बेधुंद २०२४ उत्साहात, जांभोरे दाम्पत्य ठरले बेस्ट कपल…!

188

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि ना.दीपक भाई केसकर मित्रमंडळ आयोजित नववर्ष स्वागत कार्यक्रम दिनांक १ जानेवारी रोजी “आवाज आर्ट इव्हेंट प्रस्तुत बेधुंद २०२४ हा महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित गायक वादक कलाकारांचा लाईव्ह म्युझिकल गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला याच दरम्यान सावंतवाडी मध्ये प्रथमच बेस्ट कपल स्पर्धा तुफान रंगली. या तुफान गर्दी झालेल्या या स्पर्धेचे बेस्ट कपल होण्याचा मान “जंभोरे कपल” लां मिळाला महेश – स्नेहल जांभोरे जोडीला प्रथम पारितोषिक बक्षीस म्हणून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे सोन्याची नथ आणि सन्मानचिन्ह,मेडल , प्रशिस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले..तर  संकेत पूजा सावंत दुसरा तर वडोकर दाम्पत्य यांनी तिसरा क्रमानं मिळवला..ह्या स्पर्धेतील सर्वांत वयस्कर सडेकर दांपत्याने सर्वांचीच मन जिंकून प्रेमाला वय नसतं हे दाखवून दिलं.. ह्या स्पर्धेतील द्वितीय तृतीय क्रमांक साठी चांदीच्या भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह तर  सडेकर आणि सलाडणा आणि सावंत डॉक्टर दाम्पत्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे  महालक्ष्मी तथास्तु मॉल कडून देण्यात आली..ह्या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी आणि पत्रकार श्री प्रवीण मांजरेकर आणि अभिनेता निवेदक श्री निलेश गुरव  यांनी केली. स्पर्धे दरम्यान निवेदक राहुल कदम आणि शुभम धुरी यांनी उपस्थित रसिकांची मन जिंकली.

तसेच दरम्यान सुरू असलेल्या बेधुंद गीतांच्या मैफिलीला ही रसिकांची मन पसंती मिळाली यात गोवा महाराष्ट्रतील गायक स्नेहल गुरव, प्रहर्ष नाईक, विठ्ठल केळुसकर, विधिता केंकरे यांनी आपल्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली..ह्या कार्यक्रमाची संपूर्ण नियोजन जबाबदारी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व शरद पेडणेकर यांनी घेतली होती. सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव, सदस्य शरद पेडणेकर, शामराव हळदणकर, हेलन निबरे, प्रसाद कोदे, अशोक पेडणेकर, सुजय सावंत, शेखर सुभेदार,रूपा मुद्राळे या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल कदम तसेच सर्वच सामजिक बांधिलकीचे आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र यांनी विशेष परिश्रम घेतले.. या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले ते माजी नगराध्यक्ष अनारीजिन लोबो ,माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष बाबू कुडतरकर त्याचप्रमाणे दीपकभाई मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे तसेच माजी नगरसेविका व पदाधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.