Home स्टोरी सातोसे येथील आजारी वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलिकीची मदत.

सातोसे येथील आजारी वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलिकीची मदत.

160

सावंतवाडी प्रतिनिधी: श्रीमती कुंदा यशवंत बर्डे राहणार सातोसे ही वृद्ध महिला काल रात्री शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी एसटी बस स्टँड सावंतवाडी येथे फिट येऊन पडल होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व रक्त वाहत होतं. त्यावेळी कलंबिस्त येथील कांचन बाळकृष्ण कदम हिने तिला उचलून डोक्याला रुमाल बांधला व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ शेखर सुभेदार यांना कॉल करून याची कल्पना दिली. त्यानंतर लगेचच सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार, प्रवीण पटेकर व नाना देसाई बस स्थानक जवळ पोहोचले. सदर वृद्ध महिलेच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला व चहा पाणी देऊन त्या वृद्ध महिलेला काही काळ त्याच ठिकाणी शांत बसवले. त्यावेळी तिथेच सावंतवाडी पोलीस डूमिंग डिसोजा उवस्थित होते. त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन पोलिसांची गाडी मागवली व बांदा पोलीस ठाण्यातून माजी सरपंच सातोसकर यांच्याशी संपर्क केला.

त्या महिलेला कॉन्स्टेबल पोलीस ठाण्यातून पी. बी.नाईक व सुभाष नाईक, पोलीस डुमिंग डिसोजा व शेखर सुभेदार यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व प्राथमिक उपचारानंतर नंतर सदर वृद्ध महिलेला महिला कॉन्स्टेबल पी.बी. नाईक, सुभाष नाईक व सामाजिक बांधिलकीचे शेखर सुभेदार यांनी रात्री १० वाजता सातोसे येथे माजी सरपंच सातोस्कर यांच्याशी संपर्क करून घरी सातोसे या ठिकाणी जाऊन नातेवाईकांच्या स्वाधीन केले.