कुडाळ प्रतिनिधी: युवा सेनेचे कुडाळ तालुका प्रमुख माणगाव खोऱ्याचे युवा डॅशिंग नेतृत्व,कट्टर शिवसैनिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आरोग्य विषयक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये तन-मन-धन अर्पण काम करणारे युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना कुडाळचे विद्यमान तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मित्र परिवारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे,भारतीय विद्यार्थी सेना ते युवासेना असा त्यांच्या प्रवास अतिशय खडतर प्रामाणिक होता शिवसेना पक्षात अनेक घडामोडी झाल्या माजी आमदार जिजी उपरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ही पक्षाशी प्रामाणिक राहून आमदार वैभव नाईक यांच्या सोबत पक्ष संघटना माणगाव खोऱ्यात अधिक भक्कम केली.
माणगाव गावचा विकास गावामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या जिथे अडचण असेल तेथे योगेश धुरी धावत जाऊन मदत करणारा हसत व्यक्तिमत्व भविष्यात उच्च पदावर किंवा राजकीय पटलावर एक मोठं नाव म्हणून माणगाव खोऱ्यात बघितलं जातं. येणाऱ्या भविष्यकाळात जिल्हा परिषद उमेदवार म्हणून योगेश धुरी यांच्याकडे पाहिले जाते. अगदी तळागाळातून काम करत युवा सेनेची धुरा सांभाळत जनतेचे अनेक प्रश्न मांडत जनतेच्या अनेक प्रश्नांना प्रश्नांना वाचा फोडली.
सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावून आपल्या परीने सर्व कार्यक्रमाला मदत करणे,आरोग्य विषयक लोकांना मदत करणे, एखाद्यावर अन्याय होत असेल तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणे अशी अनेक कामे करत जनतेच्या मनात स्थान निर्माण केला आहे. गावच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने ही केली आहेत. आंबेरी पुलाचा प्रश्न असूदे, माणगाव आरोग्य केंद्राचा प्रश्न असूदे, एसटी बाबत समस्या असूदे अशा वेळी सर्व कामात योगेश धुरी पुढे असतात. कोरोना काळात अनेक लोकांना त्यांनी मदत केली. नुकताच शैक्षणिक क्षेत्रातला डीएड पदवीधारकांचा प्रश्न असू दे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी योगेश धुरी नेहमी सतर्क असतात.
योगेश धुरी यांच्या माध्यमातून अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम सुद्धा केला आहे शिक्षणापासून एखादा वंचित राहत असेल तर त्यालाही मदत करणे अपंग व्यक्तीला मदत करणं रस्ते वीज पाणी यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा योगेश धुरी नेहमी पुढे असतात आपले आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून अनेक विकास काम या माणगाव खोऱ्यामध्ये खेचून आणली आहेत आणि यावर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली माणगाव ग्रामपंचायतची सत्ता तब्बल २५ वर्षानी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे आणली.
माणगाव खोऱ्यामध्ये योगेश धुरी यांचा मोठा युवा मित्रपरिवार असल्याने नियमित त्यांच्या मित्रपरिवारची साथ ही त्यांना लाभली आहे माणगाव मध्ये कबड्डी स्पर्धा असू दे माणगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा असू दे हॉलीबॉल स्पर्धा असू दे कोणत्याही स्पर्धेला नेहमी सहकार्य असत योगेश धुरी यांचं त्यामुळे भविष्यात योगेश धुरी यांना उच्च पदावर जाण्यासाठी सर्वच मित्र परिवाराकडून या जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.