सावंतवाडी प्रतिनिधी: सांगेली मार्गावर आज दुचाकीचे तीन अपघात झाले. या अपघातात मोटरसायकलस्वारना दुखापत झाली आहे. तीन अपघातातील जखमी ना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात बँडेज पासून इंजेक्शन आधी कुठलेही साहित्य उपलब्ध नसल्याने या जखमींना उपचाराविना माघारी परतण्याची वेळ आली. सदर केंद्रातील डॉक्टरांनी या जखमींवर प्राथमिक उपचार केले. खरे पण या आरोग्य केंद्रात औषध साठा नाही तसेच बँडेज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने डॉक्टर व नर्सना व कर्मचाऱ्यांना नाहक रुग्णांच्या नातेवाईकांच्या रो साला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ व माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत यांनी आज याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्षही वेदले आहे. सध्या आरोग्य केंद्रात औषध व इंजेक्शनचा पुरवठाच कमी आहे. जिल्हास्तरावरूनच उपलब्ध नाही असे सांगण्यात आले.