Home स्टोरी सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव २०२३ उत्साहात संपन्न!

सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव २०२३ उत्साहात संपन्न!

234

सिंधुदुर्ग: सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव २०२३ रानभाज्या प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या रानभाज्या स्पर्धेमध्ये जवळपास ३६ स्पर्धकांनी भाग घेतला. कुडाळ, सावंतवाडी, आंबोली, वेंगुर्ले, दोडामार्ग आदी भागातून रानभाज्या चे स्टॉल वापरण्यात आले होते. या रानभाज्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

कणकीच्या कोंबा चे कटलेट या रान भाजीला वैशाली मिसाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक फागल्याचे मोदक संगीता पाटकर,  तृतीय फागल्याचा मोठ ला उमा चोडणकर, उत्तेजनार्थ अंबाड्याची खिचडी व फागल्याचे भरीत भावना सबनीस,  तर कोबीची बिर्याणी कटलेट मधुरा धुरी आणि उत्तेजनार्थ फागुला रेसिपी अनमोल गावडे व तिघा जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

सावंतवाडी येथे हॉटेल पलॅ येथे क्रांती दिना दिनी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या रेखा कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षिस वितरण माजी आमदार राजन तेली, रेखा कुमठेकर, आहार तज्ञ श्रीमती विनया बाड, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते विजेत्या तीन क्रमांकावर तीन उत्तेजनार्थ अशा सहा जणांना रोख रक्कम देऊन पारितोषिक देण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यवाहक एडवोकेट संतोष सावंत, सचिव प्रताप परब, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, गजानन बांदेकर, प्रमोद सावंत, विजय चव्हाण, शशिकांत मोरजकर, संदीप सुकी, नाना बिडये, दीपक राऊळ, सुरेश सांगेलकर, वैदेही गावडे, संगीता सावंत, वंदना राहुल, मंगल देसाई,  सौ. मोरजकर, सौ राऊळ, सौ सरमळकर, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, विजय देसाई, अनंत जाधव, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, श्री सांगेलकर, अभिषेक राऊळ, परीक्षक दिव्यांनी कुमठेकर, प्रसन्न कोदे आधी उपस्थित होते सह्याद्री

 

फाऊंडेशन ने घेतलेला रानभाजी महोत्सव अत्यंत चांगला झाला. अपेक्षेपेक्षा अनेक प्रकारच्या रानभाज्या ज्यांची नावे कधी आम्ही एकली नव्हती अशी नावे एकायला मिळाली. अजूनही आपल्या महिला भगिनी रानभाज्यांचा आहारात वापर करतात. हे पाहून बर वाटल. सर्वांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजच कौतुक करावं तेवढं कमी होत.   या रान भाज्यांच्या बनवलेल्या रेसिपीची चव अत्यंत चवदार अशी होती. अशा शब्दात माजी आमदार राजन तेली यांनी गौरव उद्गार काढले.

यावेळी प्रथमेश मडगावकर हा पायलेट झाल्याबद्दल त्याच्या आईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परीक्षक श्री प्रसन्न कोदे म्हणाले सह्याद्री फाउंडेशनने रानभाज्या स्पर्धा व प्रदर्शन ठेवून आजच्या काळात लोक पावत चाललेल्या रानभाज्यांना एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. या रानभाज्या कशा बनवायच्या त्याची कार्यशाळा व्हायला हवी. या स्पर्धेमध्ये विविध आगळ्यावेगळ्या रानभाज्या डिश पाहायला मिळाले. असे महोत्सव व्हायला हवेत. यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दिल्ली दरबारी कसे भरवता येईल? या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करावेत. तरच आपल्या रानभाज्यांना एक वेगळे मार्केट निर्माण होईल. असे कार्यवाहक ॲड. संतोष सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व अध्यक्ष रवींद्र मडगावकर  अशा रानभाज्यांच्या स्पर्धा आणि प्रदर्शनामध्ये अनेक महिलांनी विविध डिश बनवून आणले ते चवदार होते. अशा स्पर्धा निश्चित वारंवार घेतल्या जातील. असे सांगितले.

उद्घाटक म्हणून बोलताना सौ कुमठेकर म्हणाल्या सह्याद्री फाउंडेशनने हा आगळा वेगळा रानभाज्यांचे प्रदर्शनाने स्पर्धा घेऊन येतील महिलांना आणि येथील खवय्यांना आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकपावत चालल्या रानभाज्यांना आता येत्या काळात चांगले महत्त्व येईल. यावेळी विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ॲड. संतोष सावंत, आभार सचिव प्रताप परब यांनी मानले.

फोटो: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ रानभाज्या प्रदर्शन विक्री स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात विजेत्या सोबत राजन तेली, संजू परब, सुनील राऊळ, रवींद्र मडगावकर, एडवोकेट संतोष सावंत, प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, प्रमोद सावंत आधी.