मसुरे प्रतिनिधी: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी त्यांना घरघंटीची आवश्यकता होती. याची दखल घेऊन माजी जी प अध्यक्ष सरोज परब यांनी स्वखर्चातून या कुटुंबाला घरघंटी घेऊन दिली. या घरघंटी मुळे या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे . सरोज परब यांनी आपल्या सामाजिक उपक्रमातून गेली अनेक वर्ष अशा अनेक गरीब गरजवंत कुटुंबाला सहकार्याच्या भावनेतून मदत केली असून अनेक गरीब कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे.
यावेळी मनोहर राणे, जगदीश चव्हाण, विजय परब, मृणाली परब, भारती चव्हाण, आत्माराम परब, कुशल सावंत, स्वपनील सावंत, चैतन्य सावंत, सानवी सावंत, शारदा सावंत आदी उपस्थित होते. सरोज परब यांच्या दातृत्वाबद्दल शारदा सावंत कुटुंबाने आभार व्यक्त केले.