सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांचा उद्या १४ रोजी वाढदिवस आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध धार्मिक व लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे. सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सिंधुदुर्ग जिल्यात शुक्रवार १४ जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात लोकउपयोगी कार्यक्रम होणार आहेत.
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या माध्यमातुन सौरऊर्जा दिव्यांचे वाटप हि होणार आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांध्ये सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उवस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांनी केले आहे.