Home Uncategorized सकाळी लवकर उठण्याचे फायदे…

सकाळी लवकर उठण्याचे फायदे…

94

१) उत्साही वातावरण.

सकाळचे वातावरण फारच उत्साहपूर्ण आणि आनंददायक असते. जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपल्याला या उत्साही वातावरणाचा अनुभव घेता येतो. सकाळची वेळ हि ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. या मुहूर्ताला अतिशय महत्व आहे. या वेळी व्यायाम करणे, ध्यान धारणा करणे, प्राणायाम करणे, सूर्यनमस्कार करणे फायदेशीर असते. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

२)आत्मविश्वास वाढतो.

सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झालेली आपल्याला पहावयास मिळेल.

३)स्वतः साठी वेळ.

सध्याच्या काळात आपण दुसऱ्यासाठी भरपूर वेळ देत असतो तरी स्वतः साठी वेळ काढणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपण स्वतः ला वेळ देऊ शकतो. पहाटे उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

४)कामात मन लागते.

सकाळी लवकर उठल्यामुळे आपले मन हे अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लीत राहते. त्यामुळे आपण जे काही काम हाती घेतो त्यामध्ये आपली गोडी वाढते. त्या कामात आपले मन लागते. त्यामुळे हा देखील एक फायदा सांगता येईल.

५)सकारात्मकता.

पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्याला शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता येतो. त्यामुळे जेव्हा आपले मन प्रसन्न व आनंदी असते अशावेळी आपल्या विचारसरणीमध्ये एक सकारात्मकपणा आलेला आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

६)वाचन.

सकाळचे वातावरण शांत आणि निवांत असते. अशावेळी आपण पहाटे उठून वाचन केले तर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मिळते. सकाळच्या वेळी वातावरण शांत असल्याने आपल्याल वाचनात अजिबात अडचणी येत नाहीत.

७)कार्यक्षमतेत सुधारणा.

ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळी आपला मेंदू अतिशय कार्यक्षम असतो. एखादे काम करताना आपल्याला अजिबात थकवा आलेला जाणवत नाही. त्यामुळे जर आपल्याला कार्यक्षमतेत सुधारणा करावयाची असेल तर आपण पहाटे उठलेले नक्कीच चांगले…

८)ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन.

ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळी आपल्याला आपली दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कामे वेळेत होत असल्याने आपल्याला कामाचे अजिबात टेंशन येत नाही. त्यामुळे पहाटे लवकर उठल्यामुळे ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन करता येते.