१ जुलै वार्ता: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो.