Home स्टोरी संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी! देवेंद्र फडणवीसांचे आवाहन.

संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी! देवेंद्र फडणवीसांचे आवाहन.

103

छत्रपती संभाजीनगरममध्ये आज रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असं आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्देवी काहीही नाही. सर्वांनी शांततेत रामनवमीचा कार्यक्रम पार पाडावा. कुठेही गडबड होऊ नये. तसेच शांततेचा भंग होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये. असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.