Home राजकारण संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा माणूस नाही! नारायण राणे

संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा माणूस नाही! नारायण राणे

79

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जैतापूर प्रकल्पावरून गंभीर आरोप केला आहे. “जैतापूर येथील वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ नये याकरता कोळशावर उत्पादन करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. हा प्रकल्प जैतापूरला होऊ देऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, पैसे देतो, असं उद्योजक म्हणाले होते. मी विधानसभेतही बोललो आहे. ५ कोटी अॅडवान्स घेतले आणि ५०० कोटींचा व्यवहार झाला. लोकं अंधारात राहिले तरी चालतील, बेकारी आली तरी चालेल, कारखाने नाही आले तरी चालेल, पण पैसा आला पाहिजे आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचे. दुर्दैवाने म्हणावं लागतं यांना बाळासाहेबांचे चिरंजीव. बाळासाहेबांच्या नखाचीही सर नाही. यांना नाही कळणार राजकारण, येऊ द्या कोकणात त्यांना”, असं नारायण राणे म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर आरोप केले.

संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, “मी त्यांना ऐकत नाही. ऐकण्यासारखं काय असतं? जनहिताचे कोणते विचार व्यक्त केले? शिव्या घालणं, वेगवगेळ्या नावांनी डिवचणं. काय कार्यक्रम आहेत त्यांना? त्यांच्या मनात जे होतं ते सफल केलं. पवार साहेबांनी त्यांना काम दिलं होतं की शिवसेना संपवून दाखव. ते त्यांनी डन करून दाखवलं. संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा माणूस नाही. ते डिप्रेशनमध्ये जात आहेत. डोकं जागेवर नाही”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली.