Home स्टोरी संकेश्वर मंदिराजवळ जमिनीत सापडली देवीची मूर्ती…!

संकेश्वर मंदिराजवळ जमिनीत सापडली देवीची मूर्ती…!

524

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी योजनेच्या पाईपलाईन खोदायचे काम चालू असताना संकेश्वर मंदिराजवळ देवीची मूर्ती सापडली आहे. पडेल येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम चालू आहे. या नळपाणी योजनेचे काम चालू असते वेळी पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्यादरम्याने सापडली आहे.

 

ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय पडेल, सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थ यांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मालक बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.