Home स्टोरी श्रीराम वाचन मंदिर समोरील खड्डे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुन्हा बुजवले.

श्रीराम वाचन मंदिर समोरील खड्डे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुन्हा बुजवले.

89

सावंतवाडी प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी श्रीराम वाचन मंदिर समोरील रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडले होते. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठ दिवसा पूर्वी सदर खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु जोरदार पावसामुळे आणि सततच्या वाहनांच्या वरदळीमुळे त्या खड्ड्यामधील सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने तेथे पुन्हा खड्डे तयार झाले होते. त्यामुळे शाळकरी मुले, वाहन चालक व नागरिकांना त्रास होऊ लागला हे लक्षात घेऊन काल रात्री पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदर खड्डे बुजवण्यात आले. आज ऊन पडल्यामुळे सिमेंट काँक्रेट घट्ट झाल्याने त्या खड्ड्यांमधील काही काळ सिमेंट काँक्रेट टिकणार आहे आणि जर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाच्या माध्यमातून ते खड्डे पुन्हा बुजवले जातील असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी पुढाकार घेतला.