Home स्टोरी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २६ रोजी पुण्यतिथी कार्यक्रम!

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २६ रोजी पुण्यतिथी कार्यक्रम!

32

मसूरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त २६ एप्रिल २०२५ रोजी श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७ वा. स्वामी, पादुका अभिषेक, सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची षोडशोपचार पूजा अर्चा, सकाळी ८:३० वा. होम – हवन,सकाळी १०:३० वा. पालखी मिरवणूक सोहळा, दुपारी ११:३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि आद्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी १२:३०वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण,दुपारी १:०० वा. अन्नदान-महाप्रसाद, सायंकाळी ६:३० वा. सुस्वर भजन श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप., रात्रौ ९ वा. काका गोसावी प्रस्तुत ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा “श्री साई समर्थ “नाट्य प्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.