Home स्टोरी श्री सातेरी देवी जलमंदिर येथे हरिनाम सप्ताह आणि कार्तिकी जत्रोत्सव!

श्री सातेरी देवी जलमंदिर येथे हरिनाम सप्ताह आणि कार्तिकी जत्रोत्सव!

283

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरामध्ये २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा. पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर दिवशी भाविक-भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यासह उपस्थित राहून हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

तसेच २५ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार असून देवीची विधीवत पुजा-अर्चा, रात्री पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर ठिक १२.०० वा. चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा महान पौराणीक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तसेच नाट्य रसिक यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.